लोकमान्य टिळक यांना मुख्यमंत्र्यांकडून अभिवादन

स्मृतिस्थळ परिसरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वृक्षारोपण

मुंबई दि. ०२ : भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अग्रणी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृतिदिनानिमित्त काल मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी स्वराज्यभूमी, गिरगाव चौपाटीवरील स्मृतिस्थळी लोकमान्यांच्या पुतळ्यास पुष्पहार व पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी त्यांच्या हस्ते ध्वजारोहण होऊन राष्ट्रगीत गायन झाले.

यावेळी राष्ट्रकवी रामधारी सिंह दिनकर स्मृती न्यासाचे अध्यक्ष नीरज कुमार यांनी लोकमान्य टिळक लिखित गीतारहस्य ग्रंथाची हिंदी अनुवादित प्रत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांना भेट स्वरुपात दिली.

अभिवादनानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुतळा परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. दरम्यान अभिवादनासाठी आलेल्या ग्रँट रोड येथील सेवासदन हायस्कूलच्या विद्यार्थी-विद्यार्थिनी व शिक्षकांसमवेत छायाचित्रदेखील काढले. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *