परभणी प्रतिनिधी,दि.०६: विविध क्षेत्रात अति उत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक, पत्नी, पाल्य यांना एकरक्कमी रू. १० हजार आणि रु. २५ हजारचे विशेष पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
याकरीता राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळातील पुरस्कार प्राप्त खेळाडु, साहित्य संगीत, गायन, वादन, नृत्य इत्यादी क्षेत्रातील पुरस्कार विजेते, पूर/जळीत/दरोडा/अपघात इतर नैसर्गिक आपत्तीमध्ये कामगिरी करणारे, तसेच देश/राज्याची प्रतिष्ठा वाढविणारे अशा स्वरूपाचे लक्षणीय कामगिरी तसेच शैक्षणीक क्षेत्रात उत्तम कामगिरी (१० वी, १२ वी मध्ये ९०% पेक्षा जास्त गुण) अशा माजी सैनिक/पत्नी/पाल्य इ. त्यांच्या सन्मानार्थ राष्ट्रीय स्तरासाठी रू. १०,०००/- व आंतरराष्ट्रीय स्तरासाठी रू. २५,०००/- चा पुरस्कार, शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह् आणि प्रशस्तिपत्र देण्याची तरतूद आहे.
जिल्ह्यातील माजी सैनिक, पत्नी, पाल्य यांनी आपले अर्ज व कागदपत्रासह जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, परभणी येथे दिनांक १५ सप्टेंबर, २०२२ पर्यंत भेट द्यावी असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी कळविले आहे.
अधिक माहितीसाठी दुरध्वनी क्रंमाक ०२४५२-२२०३४० यावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.