बॉलीवूड अभिनेत्री प्रीती झांगियानीच्या यांची प्रमुख उपस्थिती
नांदेड़( प्रतिनिधी ), दि. ०८:- नांदेडमध्ये पहिल्यांदाच वधू मेकअप आर्टिस्टला बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री प्रीती झांगियानी हिच्या प्रमुख उपस्थितीत वधूच्या स्पर्धेत सहभागी होऊन ११,००० रुपये जिंकण्याची संधी दिली जात आहे.
द ग्रँड ब्युटी अवॉर्ड शोच्या आयोजक मीनाक्षी पोलसावार आणि माया लोहार यांनी सांगितले की द ग्रँड ब्युटी अवार्ड शो १५ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी 10 वाजता कुसुम सभागृह येथे होणार आहे. ह्या शो मध्ये प्रथम एक सेमिनार सकाळी ठीक १० वाजता सुरु होणार आहे.
त्या सेमिनार मध्ये दिल्लीचे प्रसिद्ध अमितकुमार मेकप व हेअर स्टाईल शिकवणार आहेत. हा परिसंवाद दुपारी बारा वाजेपर्यंत चालणार आहे तसेच ह्या सेमिनारची फिस एक हज़ार राहणार आहे.ह्या सेमिनार नंतर मेकअप स्पर्धा होणार आहे ह्या स्पर्धेची फिस दोन हज़ार रुपये ठेवण्यात आले आहे. त्यात स्पर्धकांना एक मॉडेल तयार करायची आहे आणि तिथे आपली कला दाखवायची आहे.अवार्ड शो मध्ये प्रथम क्रमांकाच्या विजेत्यांना ११००० चे बक्षीस राहणार आहे तसेच दुसऱ्या व तिसऱ्या विजेत्यांना प्रेरणास्पद बक्षीस मिळणार आहेत असे ११ जणांना गिफ्ट बक्षीस मिळणार आहेत.हे बक्षीसे बॉलीवूड अभिनेत्री प्रीती झांगियानीच्या हस्ते देण्यात येणार आहेत.ज्यांना अभिनेत्री सोबत फोटो आणि बेस्ट ब्युटीशियनला अवार्ड घ्यायचं असेल तर त्याची फिस चार हज़ार रुपये ठेवण्यात आले आहे.
ह्या अवार्ड शो मध्ये भाग घेण्यासाठी आयोजक मीनाक्षी पोलसावार आणि माया लोहार यानां दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मीनाक्षी अमर पोलसवार ९५१८३७६१८० माया दत्तात्रय लोहार : ९०९६६९२१९२