जिल्हा परिषदेच्यावतीने उत्कृष्ट शिक्षक, गुणवंत विद्यार्थी आणि आदर्श शाळा पुरस्कार वितरणाचे आयोजन

परभणी प्रतिनिधी, दि.०९: जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागामार्फत सन २०२२-२०२३ च्या उत्कृष्ट जिल्हा शिक्षक, गुणवंत विद्यार्थी सत्कार आणि आदर्श शाळा पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास उद्घाटक म्हणुन जिल्हाधिकारी आंचल गोयल तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे हे अध्यक्ष म्हणुन उपस्थित राहणार आहेत.

 

तसेच कोल्हापुर येथील प्रसिध्द साहित्यीक तथा सामाजिक कार्यकर्ते सुनिलकुमार लवटे आणि परभणी ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे अध्यक्ष रामेश्वर नाईक हे प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत.

तर जिपचे अति. मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका रश्मी खांडेकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संदीप घोन्सीकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल जाधव, उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र तुबाकले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राहुल गिते, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नामदेव आघाव, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सचिन कवठे, समाजकल्याण अधिकारी शिवानंद मिनगीरे, गंगाधर यंबवडवाड, धोंडीराम उडानशिवे, अनिल मुरकुटे आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

 

 

 

येथील भाग्यलक्ष्मी लॉन्स, बेलेश्वर मंदिराजवळ, नांदखेडा रोड, परभणी येथे शुक्रवार, दि. ९ सप्टेंबर, २०२२ रोजी सकाळी ११ वाजता या पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे शिक्षणाधिकारी (प्रा.) विठ्ठल भुसारे आणि शिक्षणाधिकारी (मा.) आशा गरुड यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *