बुलडाणा प्रतिनिधी, दि. १५ :- जिल्हा दक्षता समितीची सभा शुक्रवार, दि. १६ सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी १वाजता आयोजित करण्यात आली आहे. तसेच भ्रष्टाचार निर्मूलन समितीची सभा मंगळवार, दि. २० सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली आहे.
ज्या नागरिकांना जिल्हा दक्षता समिती सभा तसेच जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीची सभा यामध्ये तक्रारी दाखल करावयाच्या आहेत, त्यांनी प्रतिज्ञालेखावर तक्रारी स्पष्ट शब्दात सबळ पुराव्यानिशी समितीसमोर दाखल करावे, असे आवाहन सामान्य प्रशासन विभागाचे तहसिलदार यांनी केले आहे.