उदय अन् अंत एका सामाजिक जीवनाचा

निजामरूल मराठवाड्यात संपला होता आणि लोकशाहीला नवीन पालवी फुटली होती. राजकारणात अनेक घराणी पुढे आली तसेच देगलूर तालुक्यातील अग्रगण्य नाव म्हणजे राजुरकराच.

 

 

 

 

हनुमंतरावजी, व्यंकटरावजी, विठ्ठलरावजी, केशवरावजी ,माधवरावजी ही पाच भावंड एक दिलान, एकजुटीने आपलं वर्चस्व देगलूर, मुखेड ,उदगीर तालुक्यात प्रस्थापित करत होते. त्यांचे नेतृत्व हनुमंतराव वडील बंधू करत होते. ते आर्य

समाजाच्या विचारांची बांधिलकी जपत होते. सर्व धर्म समभाव, माणसाला माणुसकीची वागणूक देणे आणि सर्वात महत्त्वाचं त्या काळात शिक्षण आणि तेही स्त्री शिक्षणाचा प्रसार ही तत्व प्रत्यक्षात आचरणात उतरत होते‌ एक हजार एकर

 

 

 

 

 

 

जमिनीची मालकी पाच बंधू कडे होती आणि सहावे बंधू म्हणजे बापूराव पाटील खतगावकर, राजूरकर बंधूचे मावस भाऊ नात्याने पण प्रत्यक्षात सख्खा भाऊ.
काळ ओघात ही माणसं पडद्या आड गेली. समाज मनावर आपल्या पाऊल खुणा

 

 

 

 

 

कायमचे ठेवून .नवीन पिढी उदयास आली. विविध क्षेत्रात कर्तुत्व गाजवणारे मुले या घराण्यात जन्माला आली डॉक्टर, इंजिनिअर, सैनिक अधिकारी ,कुलगुरू तसेच व्यावसायिक ही. मुलीही चांगल्या घरात गेल्या आणि नेटाने आपला संसार चालवला.

 

 

 

 

 

माननीय राजाभाऊ पाटील, माननीय शरद पाटील माननीय, अशोक पाटील ,माननीय विजय पाटील ,माननीय शेखर पाटील आणि लहान बंधू उदय पाटील राजूरकर ह्यांनी सामाजिक आणि राजकीय जीवनात नाव कमवलं. स्त्री शिक्षणाचा

 

 

 

 

 

वारसा त्यांच्या घरातील बायलेकी आजही चालवतात सौ दीप्ती राजाभाऊ वाजे,डॉक्टर अर्चना शाहू पाटील, डॉक्टर अंजली पाटील या मुलीही विविध क्षेत्रात आपलं नाव कमवतात. अगदी नवतरुण पिढीतही शिक्षणाचा प्रसार आणि कुटुंबात

 

 

 

 

 

आहेत .या नवीन पिढीनेही नामांकित विविध क्षेत्रात प्रवेश मिळवला आहे. खतगावकर, चिखलीकर, गोरे, तोरणेकर, एकंबेकर, घाट बोराळकर, शिरोळकर या सुप्रसिद्ध घराण्याशी यांचं नातं आहे..

 

 

 

 

 

तो काळ ९१ ९२ चा असेल अशाच एका सकाळी मी माझ्या बाबासोबत घराच्या अंगणात उभा होतो जळून जाणाऱ्या रस्त्यावर अचानकपणे महिंद्रा जीप थांबली त्या गाडीच त्यावेळेस फार मोठा आकर्षण होत. गाडीतून एक राजबिंडा मध्य वयस्कर

 

 

 

 

 

तरून उतरला. कपाळ मोठ, गोरा पान वर्ण, मध्यम उंची ,तितकीच भेदक नजर ,कपाळावर विजयी गुलाल, पांढरी शुभ्र कपडे आणि पायात काळे बुट. मनमोहक व्यक्तिमत्व.मी बघत होतो ती व्यक्ती गाडीतून उतरत, बाबांना आवाज दिला मारुती

 

 

 

 

 

दादा. बाबां अत्यंत प्रेमाने त्यांच्याकडे धावले. क्षणात आजूबाजूची मंडळी जमा झाली. हा हा म्हणता जमाव जमा झाला ती व्यक्ती सर्वांची लाडकी होती. ही गोष्ट मी त्या बालवयात ओळखलं होतं. सर्वांना प्रेमाने बोलून त्या व्यक्तीने सर्वांचा निरोप

 

 

 

 

 

घेतला. ती प्रतिमा माझ्या मनात राहून गेलली. ती व्यक्ती परतत असताना माझ्या जवळ आली आणि अगदी प्रेमाने म्हणाले दादा हा तुमचा मुलगा आहे का. बाबांनी होकार दिला. एक नजर माझ्यावर टाकली ती नजर कायम माझ्यावर राहिली अगदी

 

 

 

 

 

शेवटच्या क्षणापर्यंत. ती व्यक्ती म्हणजे उदय पाटील राजूरकर आपल्या सर्वांचे लाडके उदय दादा अन आमचे उदय काका. शिक्षणासाठी ग्रामीण भागातून काही मंडळी हैदराबादला गेली त्यापैकी खातगावकर बंधू, राजुरकर बंधू, आणि माझ्या

 

 

 

 

 

मोठे काका सदाशिवराव लच्छनकर यांच्यासोबत माझे बाबा, माझे दुसरे काका रामचंद्र पाटील ,या सर्व मित्रांची गाठभेट हैदराबादला झाली .मैत्रीचं रूपांतर बंधू भावात कधी झालं कळलं नाही. आयुष्यभर भावाचं नातं त्यांनी जपलं हे मात्र खरं.

 

 

 

 

 

विविध जिल्हा परिषद गणातून उदय पाटील राजूरकर यांनी विजय मिळवला. बऱ्याचदा मार्केट कमिटीवर स्वबळावर पॅनल निवडून आणून ते सभापती झाले. पंचायत समिती सभापती म्हणून त्यांनी उल्लेखनीय कार्य केलं. जिल्हा परिषद

 

 

 

 

 

शिक्षण सभापती म्हणून त्यांची कारकीर्द गाजली. उदय काकांनी निवडणूक लढावी आणि त्याचा त्यांचा पराभव व्हावा असं कधी झालं नाही. तालुक्यात अपराजित राहिले. फक्त त्याला एक अपवाद अपक्ष विधानसभेची निवडणूक लढवली आणि

 

 

 

 

 

त्यात थोडक्या मतांनी त्यांचा पराभव झाला‌ पक्षाचे पाठबळ असतं तर ते नक्कीच आमदारही झाले असते दुसरी संधी हुकली ती जिल्हा परिषद अध्यक्ष पदाची या दोन्ही घटना उदय काकांच्या अनेक चाहत्यांना समर्थकांना सहकार्यांना आजही

 

 

 

 

 

वेदना देऊन जातात.
प्रचंड लोकसंपर्क, सुख दुःखाला धावून जाणे ,वेळेचे बंधन काहीच नाही कधीही रात्री अप रात्री उदय पाटलांना लोक मदत मागत आणि ते मदत ही करत .इतकी वर्ष प्रत्यक्ष सत्ता स्थानी असूनही पैशासाठी काही बेईमानी करावी असं कधी उदय

 

 

 

 

 

पाटलांना वाटलं नाही. लोकांच्या पाठिंबावर निवडून यायचं आणि प्रामाणिकपणे त्यांची सेवा करायची .बऱ्याच कुटुंबांनी त्यांना आपलं कुटुंब प्रमुख मानलं होतं. घरातील शेतीच्या वाटण्या असो किंवा मग लग्न समारंभ उदय पाटलांचा शब्द अंतिम

 

 

 

 

 

असायचा. कौटुंबिक वाद, गावातील वाद उदय पाटलांच्या बैठकीत मिळायचे.
गेल्या दहा वर्षापासून प्रकृतीच्या कारणामुळे ते सक्रिय राजकारणापासून दूर होते पण समाजात त्यांच स्थान आबादित होतं. अनेक लोक त्यांना भेटायला जायचे,

 

 

 

 

 

दृष्टीशीन झाली होती पण नुसत्या आवाजावरून ते माणसांना नावाने ओळखत. लोकांशी नाळ जोडल्याशिवाय हे शक्य होत नाही.
शुक्रवारी संध्याकाळी काळान झडप घातली आणि त्यांची प्राणज्योत मावळली. ही

 

 

 

 

 

दुःखद वार्ता सगळीकडे पसरली आणि मलाही कळली. दुःखान मन भरून गेल्. त्यांच्या अंत्यविधीसाठी हजर राहिलो. समाजातील सर्व स्तरातील लोकांचा प्रचंड जनसमुदाय आपल्या लाडक्या नेत्याला शेवटची श्रद्धांजली देण्यासाठी उपस्थित

 

 

 

 

 

होता.
या सर्वांमध्ये खासदार आमदार अनेक राजकीय लोक विविध पक्षाचे ,कुटुंबातील, नात्यातील मंडळी तसेच सामान्य माणसं ज्यांनी उदय पाटलांनवर आयुष्यभर भरभरून प्रेम केलं आणि साथ ही दिली.

 

 

 

 

 

पण या गर्दीत सामील झालेले रमेश दादा देशमुख शिळवणीकर आणि शिवाजीराव देशमुख बळेगावकर माझं लक्ष वेधून घेत होते. कारण बऱ्याचदा राजकीय जीवनात या दोघांनी उदय पाटलांना विरोध केला होता पण वैयक्तिक पातळीवर तेही उदय

 

 

 

 

 

पाटलांच्या सन्मान करत होते याची ग्वाही शिवाजीराव देशमुख बळेगावकर यांच्या श्रद्धांजली पर मनोगतात उपस्थित त्यांना कळली.
याप्रसंगी मा खासदार भास्कररावजी पाटील खतगावकर यांनीही श्रद्धांजलीपर

 

 

 

 

 

मनोगत व्यक्त केलं उदय पाटील राजूरकर यांनी नेहमीच मा खासदार भास्कररावजी पाटील खतगावकर यांना भक्कम साथ दिली अनेक राजकीय व्यासपीठावर हे दोघे उपस्थित राहायचे .माननीय खासदार भास्करराव पाटील

 

 

 

 

 

खतगावकर हे नेहमीच माननीय उदय पाटील राजूरकर असाच उल्लेख करत पण आज त्यांनी एकेरी उदय असा उल्लेख केला. त्याचप्रमाणे आपली आई आणि मावशी त्याचप्रमाणे राजूरकरांशी असलेलं मावस भावाचं नातं त्याचाही उल्लेख केला

 

 

 

 

 

.तेव्हा आम्ही ओळखलं की बोलणारा राज्यस्तरावरील मोठा नेता आपलं सर्व राजकीय अस्तित्व विसरून केवळ उदय पाटील राजूरकर यांचा मोठा भाऊ या नात्याने बोलत होता. सुरेश पाटील राजूरकर आणि उदय पाटील राजूरकर या दोन्ही

 

 

 

 

 

बंधू अतिशय प्रेमाने कसे वागले हेही खतगावकर साहेबांनी सांगितलं उदयच्या पाठिंब्या आणि भक्कम साथी शिवाय मी शरद जोशी सारख्या दिग्गज शेतकरी संघटनेच्या नेत्याचा पराभव करू शकलो नसलो असे गौरवोद्गार ही त्यांनी व्यक्त केले.

 

 

 

 

 

बसवराज पाटील माळेगावकर यांनी सामान्य लोकांच्या उदय पाटलाविषयी असलेल्या भावना व्यक्त केल्या तर नाना मोरे यांनी आपल्या सूत्रसंचालनाच्या द्वारे उदय पाटलांच्या अनेक जीवनातील घटनांना उजाळा दिला..

 

 

 

 

 

अत्यंत दुःख द वातावरणात उदय पाटील राजूरकर यांना शेवटचा निरोप देण्यात आला.
श्रीमती शोभाताई राजुरकर सौ सोनल चिखलीकर, सौ रूपाली गोरे ,अनिकेत पाटील राजूरकर, आदित्य पाटील राजूरकर यांनाही दुःख सहन करण्याची शक्ती

 

 

 

 

 

ईश्वराने द्यावी हीच इच्छा.या लोकनेत्यांचा समर्थ राजकीय वारसा अनिकेत पाटील राजुरकर सांभाळतील ही अपेक्षा.
मी जरी एक आनंद यात्री असलो तरी जीवन प्रवासात कधी कधी दुःखाचे थांबेही

येतातच.

 

 

 

 

 

एक स्वच्छ चरित्रवान, निर्मळ, निस्पृह, लोकप्रिय, समाजाभिमुख, आपलंसं वाटणारा आणि तितकच लाडक्या व्यक्तिमत्त्वाच्या सामाजिक जीवनाचा तो उदय अन् अंत होता.

 

मी एक आनंदीयात्री
@ राजू पाटील लच्छनकर
६३०४८७३७२४ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *