भावसार व्हिजन इंडिया हैदराबाद क्षेत्र-१०४ चा २५ वा वर्धापन दिन आणि शपथविधी सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला.

 

हैदराबाद प्रतिनिधी दि.२८ :- भावसार व्हिजन इंडिया हैदराबाद क्षेत्र-१०४ चा २५ वा वर्धापन दिन आणि सर्वसाधारण (शपथ) सभा भावसार भवन, काचीगुडा येथे आयोजित करण्यात आली होती. यात प्रथम हिंगुलाज मातेचे पुजन करण्यात आले व श्रीती जोईजुडे हिने गणेश वंदना व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन वैष्णवी घनाटे यांनी केले.


माननीय अतिथी म्हणून श्री.मनीष सुत्रवे (भावसार व्हिजन इंडियाचे माजी राष्ट्रीय मंत्री) श्री. उमेश ए. जैताने (अध्यक्ष तेलंगणा भावसार क्षत्रिय रंगरेज समाज) श्री. विनोद फुटाणे (माजी बीव्हीआय राज्यपाल), श्री. मोहन राव देवतराज (राज्यपाल), श्री. राकेश गित्ते, सौ. ज्योती चुटके (लेफ्टनंट राज्यपाल) डॉ. प्रशांत नीमकर (एनईसी सदस्य) प्रवीण पतंगे (माजी अध्यक्ष) सौ. अर्चना बस्तुकर (माजी मंत्री)

उपस्थित होते. यावेळी सर्वसाधारण सभेत संचालक मंडळ २०२५ च्या अधिकाऱ्यांमध्ये प्रथम सौ.शीतल नीमकर (अध्यक्षा), श्री.शंकर आसुटकर (मंत्री), सौ.सपना घनाटे (कोषाध्यक्ष), सौ.अश्विनी पतंगे, सौ. हेमाराणी पारणकर,

सौ. वंदना आसुतकर, सौ. अर्चना सुत्रवे, सौ. तुलसी बगाडे, सौ. अनिता पारेकर, सौ. ज्योती गडाळे, सौ. संगीता घनाटे, श्री. विनोद पतंगे, श्री. राकेश. घनाटे, श्री शशांक पिसे, श्री चंद्रकांत पतंगे, विनोद महेंद्रकर, पुनीत देवतराज, यांनी शपथ घेतली.

श्री मनीषजी सुत्रवे (भावसार व्हिजन इंडियाचे माजी राष्ट्रीय मंत्री) यांना प्रतिष्ठित संस्थापक पुरस्कार (भावसार व्हिजन इंडिया समाज भूषण श्री नारायण राव बी. तातुस्कर) उमेश ए. जैताने दिली.

 

 

 

अश्विनी पतंगे व अर्चना बासुतकर यांनी कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पाडला. संक्रांतीच्या शुभमुहूर्तावर सर्व सभासदांना हळदीकुमकुमची खास भेट देण्यात आली.
यावेळी सोसायटी सदस्य भूषण सुरेश पाटील, श्री.मोहनराव बगाडे, बालकिशन सुत्रावे, श्रीधर गडाळे, हेमांबर जोईजुडे, सौ.ललिता सुत्रावे, सौ.लक्ष्मी गित्ते, सौ.आशा पतंगे, गायत्री चांदी,नित्या,कृष्णा आणि इतर भावसार सदस्य.आदी उपस्थित होते.