पोलीस उपनिरीक्षक संतोष वजुरकर राष्ट्रपती पदकाने सन्मानित.

 

बीड प्रतिनिधी, दि.२७ :- बीड जिल्ह्यातील पोलिस दलामध्ये श्री संतोष वजुरकर हे गेल्या ३८ वर्षांपासून विविध पदांवर कर्तव्यदक्षपणे कार्य करीत आहेत. याच कार्याची दखल शासनाकडून घेण्यात येवुन इ.स.२०२२ला त्यांना राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झाला होता.त्या पुरस्काराचे वितरण गुरुवारी दि. २६ रोजी राज्यपाल सी पी राधाकृष्णन याच्या हस्ते करण्यात आले.पोलिस दलातील सर्वोच्च सन्मान (President Medal)देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

संतोष पंडितराव वजुरकर ( पोलिस उप निरीक्षक) यांची पोलीस दलामधील सेवा प्रदीर्घ काळ झालेली आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत शासनाकडून गौरविण्यात आले आहे. राज्यपाल सी पी राधाकृष्णन याच्या हस्ते पोलिस दलातील सर्वोच्च President Medal देऊन वजुरकर सन्मानित करण्यात आले त्याबद्दल बीड जिल्ह्यातून त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत.