“निर्भीड पत्रकार शंकरसिंह ठाकूर यांना ‘तुफानातले दिवे’ पुरस्काराने गौरव”

 

नांदेड प्रतिनिधी,दि.१३:- निर्भीड, धडाकेबाज आणि निडर पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे दैनिक वीर शिरोमणीचे मुख्य संपादक व राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष शंकरसिंह ठाकूर यांना यंदाचा “तुफानातले दिवे”

 

पुरस्कार जाहीर झाला आहे. हा सन्मान युगकवी वामनदादा कर्डक व प्रतापसिंग बोदडे संयुक्त जयंती सोहळ्यानिमित्त प्रदान केला जाणार आहे.

 

 

शंकरसिंह ठाकूर हे नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील मौजे पांगरा येथील असून त्यांनी श्री. शिवाजी कॉलेज, कंधार येथून एम.ए. पर्यंत शिक्षण घेतले. त्यांनी पत्रकारितेत

 

अगदी छोट्या स्तरावरून सुरुवात करून अत्यल्प कालावधीत आपल्या निर्भीड लेखनशैली, परखड विचारसरणी आणि समाजहिताच्या बातम्यांमुळे राज्यभर ठसा उमटवला आहे.

 

 

शहर, तालुका आणि जिल्हा प्रतिनिधी ते मुख्य संपादक असा प्रवास करताना त्यांनी शोधपत्रकारितेच्या माध्यमातून जनतेच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवल्या. त्यांच्या कार्याची दखल घेत यापूर्वीही त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

 

 

या निवडीबद्दल नांदेड जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.