शहापूर/प्रतिनिधी, दि.२१:- देगलूर तालुक्यातील शहापुर येथे शाहिद हजरत टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त वसीम शहापुरकर मित्र मंडळ तर्फे रक्तदान व अन्नदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात एकवीस ते पंचवीस वयोगटातील युवकांनी रक्तदान केले.
या शिबिरात एकवीस ते बावीस रक्तदात्याकडून रक्तदान करण्यात आले या गावातून युवा नेते रक्तदान देण्यासाठी आले होते वसीम शहापुरकर व टिपू सुलतान समिती तर्फे तालुक्यात कुठेही रक्ताची गरज भासल्यास आपन त्या व्यक्तीला तात्काळ मदत करून देऊ शकतो या हेतुने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
वसीम शहापुरकर व टिपू सुलतान समिती यांच्या नेतृत्वाखाली अनेक कार्यक्रम राबविण्यात येतात .त्यातला एक भाग म्हणून रक्तदान शिबीर,अन्नदान घेऊन गरजूंना मदत करण्यात येते.
या प्रसंगी येथील गंगारेड्डी कोटगीरे ग्रिडर सरपंच, गणेश माडपते उपसरपंच मलरेड्डी यालावार ,व ग्रामपंचायत सदस्य विश्वम्बर पाटील तंटामुक्ती प्रमुख गंगारेड्डी कोटगीरे ,व समस्त गावकरी उपस्थित होते.