देगलूर प्रतिनिधी,दि.०२ :- देगलूर महाविद्यालय देगलूर येथे संपन्न झालेल्या अंतर महाविद्यालयीन बाँलबँडमिन्टन स्पर्धेत मुलींच्या गटात महात्मा फुले महाविद्यालय किनगावने प्रथम क्रमांक पटकावला द्वितीय क्रमांक वै.धुंडामहाराज महाविद्यालय देगलूर तृतीय क्रमांक देगलूर महाविद्यालय देगलूर तर मुलांच्या गटात प्रथम क्रमांक महात्मा फुले महाविद्यालय किनगाव द्वितीय क्रमांक महात्मा गांधी महाविद्यालय अहमदपूर तृतीय क्रमांक देगलूर महाविद्यालय देगलूर ने बाजी मारली.
यावेळी श्री नारायण आण्णा उपलंचवार यांची प्रमुख उपस्थिती होती.डॉ.निरजकुमार उपलंचवार व प्रा. सिताराम हाके प्रा.दिपक वावधाने .वै.धुंडामहाराज देगलूरकर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ दिलिप भडके यांनी स्पर्धेचे नियोजन केले.
यांचे अड्त व्यापारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री प्रकाश पाटील बेंबरेकर, संस्थेचे सचिव श्री शशिकांत चिद्रावार , उपाध्यक्ष श्री नारायणराव मैलागीरे, सहसचिव श्री सुर्यकांत नारलावार, कोषाध्यक्ष श्री विलास तोटावार व कार्यकारिणी मंडळ सदस्य श्री राजकुमार महाजन, डॉ कर्मवीर उंग्रतवार , श्री देवेंन्द्र मोतेवार ,श्री गंगाधर जोशी,
श्री जनार्दन चिद्रावार, श्री रवींद्र अप्पा द्याडे. श्री चंद्रकांत नारलावार, प्राचार्य डॉ. मोहन खताळ,उपप्राचार्य डॉ. अनिल चिद्रावार, उपप्राचार्य श्री चमकुडे एम एम , पर्यवेक्षक प्रा. संग्राम पाटील , कार्यालय अधीक्षक श्री गोविंद जोशी यांनी आभिनंदन केले आहे.