मदनुर प्रतिनिधी सोपान दंतुलवाड दि १३: मदनुर विभागातील सर्व गावांच्या मेंढ्या आणि शेळ्यांना रोगप्रतिबंधक औषधे दिली जात आहेत. . कामरेड्डी जिल्ह्यातील मदनूर विभागातील २३ ग्रामपंचायतींमधील ३८ गावांमधील सर्व मेंढ्या आणि शेळ्या दरवर्षी पावसाळ्यात विविध आजारांनी ग्रस्त असतात, त्यामुळेच दरवर्षी हजारो मेंढ्या आणि शेळ्या मरतात. त्या मरु नये म्हणून प्रत्येक रुग्णालयात ही लस देण्यात येत आहे हा आजार, मदनूर, एकलारा (ब), चिन्ना शकर्गा, या भागात जास्त प्रमाणात आहे व पावसाळ्यात हा आजार जास्त प्रमाणात वाढतो, पावसाळा आजही चालू आहे, त्यामुळे ही लस देण्यात येत आहे आज सककरगा येथील स्थानिक सरपंच गफ्फार साब हे सर्व मेंढ्या -बकऱ्यांना अन्न देत आहेत.डॉ.विजय बंडीवार यांनी याबाबत माहिती दिली आहे. मेंढ्या आणि शेळ्यांना औषधांचा डोस देणयाचे आवाहन नागरिकांना या वेळी करण्यात आले.