हैदराबाद प्रतिनिधी, दिनांक १५ : आज रामंतापुर गोखलेनगर येथे उप्पल मेरू कुला संकसेमा संगम यांच्या वतीने ७५ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले झेंडा निमित्य सर्वांना अल्पोपहार पेढे देण्यात आले याप्रसंगी अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव व इतर पदाधिकारी उपस्थित होते तसेच समाज बांधव देखील उपस्थित होते.
याप्रसंगी सर्व वरिष्ठांनी समाजातील बांधवांना कोरोना काळात संयम ठेवून काम करावयास आणि विशेष करून या काळात आर्थिक बाजूने खचून न जाता धैर्याने वेळ पुढे नेण्यासाठी मार्गदर्शन केले आणि समाज बांधवांना धैर्य दिले या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी आर. करूनाकर, के. मल्लेश, एस. विष्णु, के. रमेश, दीपक, के.जनार्धन पी. राजेंद्र, आर. विक्रम, एस. जंयत यांनी विशेष परिश्रम घेतले.