प्रेस संपादक व पत्रकार सेवसंघाचे नांदेड जिल्ह्यातील पत्रकार संघटनेचे काम भक्कमपणे सुरू- युवा अध्यक्ष मा.मारोती झम्पलवाड

 

 

किनवट प्रतिनिधी,दि.१५ :- प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे मराठवाडा युवा अध्यक्ष मा. मारोती झम्पलवाड यांनी किनवट येथील प्रेस संपादक पत्रकार सेवा संघाच्या कार्यालयास भेट देऊन किनवट तालुका कार्यकारणी व युवा कार्यकारणीतील सदस्यांशी पत्रकारांच्या विविध समस्या विषयी व इतर विषयी संगोपन चर्चा केली.

याप्रसंगी त्यांच्या समवेत अनुप अनमवार( बँक मॅनेजर नांदेड, प्रदेश अध्यक्ष गोल गोल्लेवार समाज संघटना) शिवाजी बोड्डेवार माजी सरपंच कोसमेट ता.कार्याध्यक्ष )
याप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांचे पुष्पराने स्वागत करण्यात आले.

 

 

 

याप्रसंगी बोलताना ते म्हणाले की,प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे कार्य संस्थापक अध्यक्ष डी.टी. आंबेगावे, मराठवाडा संपर्कप्रमुख आनंद भालेराव, नांदेड जिल्हाध्यक्ष संजीवकुमार गायकवाडयांच्या नेतृत्वात भक्कमपणे सुरू असून नांदेड जिल्ह्यातील पत्रकार संघटनेचे काम भक्कमपणे सुरू आहे.

 

 

 

 

 

 

प्रत्येक तालुक्यात प्रेस संपादक पत्रकार सेवा संघाची कार्यकारिणी असून प्रत्येक कार्यकारणी उत्कृष्ट काम करत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त पत्रकार प्रेस व संपादक व पत्रकार सेवा संघाला जोडले जात आहेत.

 

 

 

याप्रसंगी प्रेस संपादक व पत्रकार मराठवाडा संपर्कप्रमुख आनंद भालेराव, तालुका अध्यक्ष नसीर तगाले, कार्यकारणी सल्लागार विलास सूर्यवंशी, युवा तालुका अध्यक्ष प्रणय कोवे, युवा प्रसिद्धीप्रमुख रमेश परचाके, तालुका सदस्य इंद्रपाल कांबळे, ज्येष्ठ पत्रकार जयवंत कांबळे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *