शहरातील २५ रक्तदात्यांनी केले रक्तदान
सर्पमित्र विजय गुप्ता व मित्रमंडळ तर्फे सन २०१२ पासुन ते २०२१ आतापर्यंत ४०० रक्तदात्यांनी केले रक्तदान
कुंडलवाडी वार्ताहर,दि.१८:
बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी शहर परिसरातील २५ रक्तदात्यांनी १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून कुंडलवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि.कुंडलवाडी येथे रक्तदान शिबिरात भाग घेऊन रक्तदान केले.
यात अंकुश जायेवार,राजेश्वर मुनगीलवार,किशन वासमवार,कैलास जडलवार,राजेश हमंद,संदिप पेंडकर,सिध्दराम मुक्केरवार, शिवकुमार गंगोणे, कृष्णा भोरे,रफत खान, सायलू अर्जापुरे,नरेश बरडे,आशुतोष टाक, कृष्णा चाकटवार,मोहम्मद अन्सार,रवीकुमार कोरेवार,साईनाथ बोडके,निखिल पेंटावार,
सायलू गुडमुलवार,राजेश बंटावार,सचिन बिल्लावार,नागेश्वर गंपलवार,किशन डोंगरे,गणेश कोटलावार,साईनाथ राजडवाड आदी रक्तदात्यांनी रक्तदान करुन सहकार्य केले.
यावेळी रक्तदान शिबिरात श्री.हजुर साहेब ब्लड बँकचे कर्मचारी सचिन थोरात,करूणा जाधव,पल्लवी सरोदे नांदेड यांनी परिश्रम घेऊन रक्तदान करून घेतले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्पमित्र विजय गुप्ता,रफत खान मित्रमंडळ परिश्रम घेतले आहे.