शिरूर ताजबंद ( प्रतिनिधी ) दि.०२ :- येथील शिवपार्वती मंगल कार्यालयात दिनांक ३०/९/२०२३ रोजी अहमदपूर तालुकास्तरीय पोषण महा या कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून शिरूर ताजबंद येथील सरपंच माननीय मच्छिंद्रजी वाघमारे साहेब तसेच उद्घाटक म्हणून तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संतोष बस्तापुरे , प्रमुख
पाहुणे बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती शोभा घोडके , प्राथमिक आरोग्य केंद्र शिरूर ताजबंद चे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शरद गिरी तसेच शिक्षण विस्तार अधिकारी श्री मन्नान शेख साहेब, शिवपार्वती मंगल कार्यालयाचे व्यवस्थापक शिवा स्वामी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री घोसे सर, आयसीडीएस कार्यालयाचे श्री शिरीष फुलारी , पंचायत समितीचे रोकडे साहेब
तसेच अंगणवाडी पर्यवेक्षिका उषा सोळुंके , अनुपमा पाटील ,सुनिता आढाव ,दैवशाला स्वामी ,शोभा केंद्रे, सुलोचना दंडीने, पल्लवी मुंडकर व तालुक्यातील अंगणवाडी कार्यकर्ती , मदतनीस, किशोरवयीन मुली, पालक व महिला मोठ्या प्रमाणात हजर होते.
प1)पोषण माहा ०१ सप्टेंबर ते ३०
सप्टेंबर या कालावधीत तालुक्यातील प्रत्येक अंगणवाडीत राबवून महिला व बालकांना पोषणाचे महत्त्व आहार प्रदर्शनाच्या माध्यमातून सांगण्या आले.
२) योग्य सकस व चौरस आहार घेतल्यास बालके कुपोषित होणार नाहीत त्यामुळे किशोरवयीन मुली गरोदर व स्तनदा माता यांनी परिपूर्ण आहार घेण्याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.
३) तसेच या मेळाव्यात रानभाज्या, कडधान्य ,भरडधान्य, उकडलेले पदार्थ, आंबवलेले पदार्थ, तळलेले पदार्थ असे विविध प्रकारच्या भाज्या फळे व पदार्थाचे स्टॉल मांडून उपस्थित महिलांना ” सही पोषण देश रोशन ” याबद्दल मार्गदर्शन केले.
४) तसेच जन्मानंतर सुरुवातीचे क्षण मोलाचे कसे असतात याबद्दल सताळा बीट मधील अंगणवाडी कार्यकर्ती व मदतनीस यांनी अतिशय सुंदर असे आरंभचे स्टॉल मांडून उपस्थित महिला व पुरुष त्यांना आरंभ माहिती सांगितली तसेच आरंभ उपक्रम घराघरात पोहोचायला पाहिजे याबद्दल माहिती दिली.
५) त्याचप्रमाणे रांगोळीच्या माध्यमातून ” बेटी बचाव बेटी पढाव ” ” पोषण भी पढाई भी ” तसेच स्वच्छता, आरोग्य शिक्षण, लसीकरण संदर्भ सेवा व इतर महत्त्वाच्या बाबीवर प्रकाश टाकण्यात आला.
६) या कार्यक्रमात ओटी भरण , अर्धवार्षिक वाढदिवस मुलीच्या जन्माचे स्वागत इत्यादी उपक्रम घेऊन शेवटी पोषण प्रतिज्ञा व स्वच्छतेची शपथ घेऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. या कार्यक्रमास अहमदपूर तालुक्यातील सर्व अंगणवाडी कार्यकर्त्या ,मदतनीस व प्रतिष्ठित महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे सहशिक्षक श्री. भोपे सर यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सिरुर ताजबंद येथील आंगनवाडीच्या आशाताई मोरे , कालिंदा वळसणे , शोभाताई केजगीरे, अनिता बडगीरे, वर्षा बलशेटवार आदिनी सहकार्य केले.
शेवटी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पर्यवेक्षिका शोभा केंद्रे यांनी मानले व कार्यक्रम संपला असे जाहीर केले.