पोलीस निरीक्षक मुंडे यांच्याकडून मतदान जनजागृतीची शपथ.

देगलूर प्रतिनिधी, दि.०५:-  देगलूर तालुक्यातील सर्व पोलीस पाटील तसेच महसूल कर्मचारी यांना निवडणुकीच्या अनुषंगाने काल दुपारी देगलूर पोलीस स्टेशन येथे एकत्र बोलावून विधानसभा व लोकसभा पोटनिवडणुकीच्या संदर्भात विविध विषयावर चर्चा करण्यात आली.

तसेच पोलीस पाटील व महसूल कर्मचाऱ्यांना  मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी शपथ देण्यात आली आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इतर बाबीवरही पोलीस निरीक्षक मारुती मुंडे हे करडी नजर ठेवून आहेत.