देगलूर (प्रतिनिधी) दि.०२ :- देगाव (ता. देगलूर) येथील ज्येष्ठ विधीज्ञ आणि सामाजिक क्षेत्रातील सक्रिय व्यक्तिमत्त्व ॲड. सुरेश जयवंतराव देसाई देगावकर (वय ८१) यांचे शनिवार, दि. २ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ५
वाजता दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे नांदेड जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.
ॲड. देसाई यांनी आपल्या दीर्घ कारकिर्दीत सरकारी वकील म्हणून नावलौकिक मिळवला होता. त्यांची न्यायव्यवस्थेतील सेवा आणि समाजातील योगदान अमूल्य होते. ते काही
काळ देगलूर नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष म्हणूनही कार्यरत होते. जवाहर क्लब आणि इतर अनेक सामाजिक संस्थांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता.
अंत्यसंस्कार रविवार, दि. ३ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता त्यांच्या मूळ गावी देगाव (बु), ता. देगलूर येथील शेतामध्ये पार पडणार आहेत.
त्यांच्या पश्चात पत्नी भारतीताई देसाई, मुले अंकुश देसाई (शिवस्मारक समिती अध्यक्ष व माजी नगरसेवक), डॉ. अक्षय देसाई, एक कन्या, बंधू अशोक देसाई (माजी सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती), पांडुरंग देसाई,
पुतणे योगेश देसाई (उपायुक्त, बृहन्मुंबई महापालिका), राहुल देसाई (तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस) आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.
त्यांच्या निधनाने न्याय व समाजकारण क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.