दंतुलवार सोपान मरखेलकर, मदनुर प्रतिनिधी दि २८ : काल मदनूरमधील सर्व सरकारी शाळा सुरू होण्यापूर्वी स्वच्छतागृहे स्वच्छता, शाळेतील इमारतीची स्वच्छता, आणि पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनची दुरुस्ती केली जात होती.
याबाबत सविस्तर वृत्त असे आहे की तेलंगणा सरकारने दिलेल्या आदेशानुसार १ सप्टेंबर पासून सर्व शाळा सुरू होत आहेत त्या अनुषंगाने विद्यार्थ्याला कसल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून तेलंगणा राज्य सरकारच्या आदेशानुसार, शिक्षण मंत्री, शिक्षण विभाग, कामरेड्डी जिल्हा शिक्षणाधिकारी. यांच्या आदेशानुसार, सर्व मंडळ शिक्षण अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, मदनूर मंडळाच्या सर्व सरकारी शाळा स्वच्छ आणि स्वच्छ केल्या जात आहेत आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था. मदनूरचे एम.पी.डी.ओ . आणि शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक, सफाई कामगार उपस्थित होते. असेच काहीसे चित्र खाजगी शाळांत शाळा देखील पाहण्यास मिळत आहे. तर दुसरीकडे शाळा सुरू होणार यामुळे विद्यार्थ्यांमध्ये देखील उत्साहाचे वातावरण दिसत आहे आपल्या शाळेची जय्यत तयारी विद्यार्थ्याकडून सुरू आहे पेन पेन्सिल ए व या दप्तरे खरेदीसाठी विद्यार्थी व पालक बाजारात दिसत आहेत.