नगर परिषद नूतन व्यापारी संकुल येथे महाआरोग्य कोव्हिड लसीकरण राबविण्यात आले .
कुंडलवाडी– रुपेश साठे दि.०९ : कुंडलवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे आयोजित महाआरोग्य कोव्हिड लसीकरण मोहीमेत एका दिवसात शहरात ३९९ तर अंतर्गत उपकेंद्रात ४७६ एकूण ८७५ नागरीकांनी कोव्हिड लस घेतले आहे.
जिल्हाधिकारी नांदेड यांच्या आदेशानवये, तालुका आरोग्य अधिकारी गणपत वाडेकर यांच्या मार्गदर्शनखाली कुंडलवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. विनोद माहूरे, डाॅ.नरेश बोधनकर व त्यांचे सहकारी आरोग्य कर्मचारी,नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या परिश्रमाने नगर परिषद नुतन व्यापारी संकुल येथे एकदिवसीय महाआरोग्य कोविड लसीकरण मोहीम राबविण्यात आले होते.
या एक दिवसीय मोहीमेत शहरातील ३९९ नागरीकांनी कोव्हिडची पहिली लस घेतली तर उपकेंद्रात ४७६ एकून केंद्राअंतर्गत एका दिवसात ८७५ नागरीकांनी कोव्हिड लस घेतले आहे.
या महाआरोग्य कोविड लसीकरण केंद्र स्थळी बिलोली तालूका गट विकास अधिक प्रकाश नाईक,तालूका आरोग्य अधिकार डाॅ.गणपत वाडेकर यांनी भेट देवून पहाणी करीत समाधान व्यक्त केले.
यावेळी प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ.विनोद माहुरे,सावंत सिस्टर,देवकाबळे सिस्टर,कदम वाहन चालक व न.पा.कर्मचारी शंकर जायेवार,मोहन कंपाळे,मारोती करपे आदी उपस्थित होते.
महाआरोग्य कोव्हिड लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी आरोग्य विभाग अधिकारी व कर्मचारी व न.प.कर्मचारी परिश्रम घेतले आहे.