नव्या पिढीसाठी गणेश चतुर्थी बद्दल थोडीशी माहिती

देशभरात गणेशोत्सव संपूर्ण उत्साहात साजरा केला जातो. पण ते साजरे करण्याची परंपरा कोठून सुरू झाली हे तुम्हाला माहिती आहे का? चला तर मग आज या लेखाच्या माध्यमातून आजच्या नवीन पिढीला गणेश उत्सवाचा सण का केव्हा, व कधी पासून सुरू झाला, सर्वप्रथम हा सण कोणी साजरा केला याची माहिती करून देऊ या तुम्ही पण जर इच्छुक असाल तर हा लेख अवश्य वाचावा .या उत्सवाची सुरुवात प्रथम महाराष्ट्रातून झाली. हा सण गणेश चतुर्थीच्या दिवशी सुरू होते आणि नंतर ११ व्या दिवशी म्हणजेच अनंत चतुर्दशीला या सणाची समाप्ती होते म्हणजेच गणेश मूर्तींचे विसर्जन करून संपते.

भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाची चतुर्थी गणेश चतुर्थी म्हणून साजरी केली जाते. शिवपुराणात उल्लेख आहे की हा उत्सव साजरा करण्याची परंपरा शतकानुशतके चालू आहे. भारताच्या दक्षिण आणि पश्चिम राज्यांमध्ये हा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. पेशवाई राजवटीपासून भारतात गणेशोत्सव साजरा केला जातो. सवाई माधवराव पेशवे यांच्या राजवटीत पूण्याच्या प्रसिद्ध शनिवारवाडा वाड्यात भव्य गणेशोत्सव साजरा करण्यात आला होता. ब्रिटिश जेव्हा भारतात आले तेव्हा त्यांनी पेशव्यांची राज्ये ताब्यात घेतली. तेव्हापासून या उत्सवाचा रंग थोडा फिका पडू लागला. पण ही परंपरा कोणीही थांबवू शकले नाही.

१० दिवसांचा उत्सव अशा प्रकारे सुरू झाला
ब्रिटिश सत्तेवर आल्यानंतर हिंदूंवर निर्बंध लादले गेले. इतिहासात असे सांगितले गेले आहे की काही राज्यकर्त्यांच्या चुकीच्या निर्णयांमुळे हिंदूंमध्ये त्यांच्या स्वतःच्या धर्माबद्दल कटुता निर्माण झाली आणि लोकांमध्ये धर्माबद्दल उदासीनता वाढली. त्यावेळी महान क्रांतिकारी आणि जननेते लोकमान्य टिळकांनी विचार केला की हिंदू धर्माचे संघटन कसे करावे? त्या वेळेस टिळकांनी विचार करून निर्णय घेतला की श्री गणेश ही एकमेव देवता आहे जी समाजातील सर्व स्तरांद्वारे आदरणीय आहे.

म्हणून त्यांनी सार्वजनिक गणेश उत्सव साजरा करण्याचे ठरविले लोकमान्य टिळकांनी हिंदूंना एकत्र करण्याच्या उद्देशाने त्यांनी १८९३ मध्ये पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. तेव्हा भाद्रपद शुक्ल चतुर्थी ते भाद्रपद शुक्ल चतुर्दशी (अनंत चतुर्दशी) पर्यंत गणेश उत्सव साजरा करायचा आणि तेव्हापासून हा उत्सव संपूर्ण महाराष्ट्रात १० दिवसा पर्यंत साजरा केला जाण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर, देशातील इतर राज्यांमध्येही हा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात येतो.

         गौरव गजानन बीडकर हैदराबाद

गणेश चतुर्थी हा हिंदूंचा प्रमुख सण आहे. हा सण भारताच्या विविध भागात साजरा केला जातो पण महाराष्ट्रात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. पुराणांनुसार गणेशाचा जन्म याच दिवशी झाला.हिंदू देव गणेशाची पूजा गणेश चतुर्थीला केली जाते. गणपतीच्या मोठ्या मूर्ती अनेक प्रमुख ठिकाणी स्थापित केल्या जातात. या मूर्तीची दहा दिवस पूजा केली जाते. जवळच्या परिसरातून मोठ्या संख्येने लोक दर्शनासाठी येतात. दहा दिवसांनंतर, गणेशमूर्ती वाजत गाजत व मोठ्या भक्तिभावाने गाणी आणि वाद्यांसह तलावाच्या पाण्यात, किंवा नदीपात्रात विसर्जित केली जाते.

एकंदरीतच या दहा दिवसात सर्व हिंदू व इतर बांधव आपली भांडणे, राग, रुसवा, फुगवा. सर्व विसरून एकत्र जमा होतात यातूनच कित्येकाची भांडणे, रुसवे-फुगवे आपापसात विसरून जाऊन पुन्हा एकत्र होतात अनेक मित्र, भाऊबंदकी, ही सर्व नाती आपली पूर्वीची अनेक वर्षाची भांडणे मिटवुन पुन्हा नव्याने संबंध स्थापित करून एकत्र होतात व नव्या जीवनाला सुरुवात करतात लोकमान्य टिळकांचा हा छोटासा प्रयत्न खरोखरच यशस्वी ठरला हेच खरे. या गणेश चतुर्थीच्या निमित्ताने बापाला एकच मागणे आपणही आपल्या आयुष्यातील जुनी रुसवेफुगवे तंटे सर्व विसरून परत आपल्या भाऊबंदकी व मित्रासह एकत्र व्हावे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *