तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून, शेतक-यांना सरसकट पिकविमा मंजूर करा.

मनसेचे शहराध्यक्ष साहेबराव कोंडावार मनसेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन

रुपेश साठे कुंडलवाडी (प्रतिनिधी) दि.१२ :

तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील कुंडलवाडी
नागणी,हरनाळी,हज्जापुर,आरळी,चन्नापुर ,पिंपळगाव, हुनगुंदा,माचनूर,मलकापुर,गंजगाव ,दौलापुर, क-हाळ, सगरोळी,बडूर,बामणी,डौर अशा अनेक गावातील शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली वाहुन आणि खरडून गेल्याने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे.

सदरील नुकसानीची तहसील प्रशासनाने तातडीने दखल घेऊन नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करुन तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, आणि तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी सरसकट पिकविमा मंजूर करण्यात यावा अशा मागणीचे निवेदन मनसेचे शहराध्यक्ष साहेबराव कोंडावार यांच्या प्रमुख उपस्थितीत शहर उपाध्यक्ष अजय गट्टूवार, सचिव महेश चौधरी,अनिकेत झंपलकर,योगेश गडपवार, सुर्यकिरण सुंकेवार यांनी तहसील कार्यालयात दिले.

यावर शासनाने तात्काळ लक्ष देऊन अतिवृष्टीमुळे नुकसान
झालेल्या पिकांचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई न दिल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तहसिल कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल असाही इशारा या निवेदनात नमुद केला आहे तर सदरील निवेदनावर मनसे शहराध्यक्ष साहेबराव कोंडावार, उपाध्यक्ष अजय गट्टूवार, सचिव महेश चौधरी, अनिकेत झंपलकर,योगेश गडपवार आदींसह इतर नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *