नांदेड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथ नांदेड जिल्हाबँकेचे उपाध्यक्ष मा. हारिहररावजी भोसीकर साहेब यांच्याकडून राठोड कुटुंबियांचे सांत्वन या बाबत सविस्तर वृत्त असे आहे की मुखेड शहरालगत असलेल्या मोतीनाला नदीच्या पुरात माजी आमदार किशन राठोड यांचा मुलगा व नातू कारसह पुराच्या पाण्यात वाहून जाऊन दोघांचा मृत्यू झाला . या दुर्देवी घटनेनंतर राठोड कुटुबांचे सांत्वन करण्यासाठी नांदेड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष व नांदेड जिल्हाबँकेचे उपाध्यक्ष मा. हरिहरराव भोसीकर साहेब ,जिल्हासरचिटणीस प्रा. डि. बी. जांभरुणकर ,जिल्हा सचिव शरद जोशी, सोणवळे सर यांनी राठोड कुटुंबियांचे कमळेवाडी येथे जाऊन सांत्वन केले. या वेळी मुखेड राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष प्रताप पाटील चौधरी, मा.शहरध्यक्ष नागनाथ गायकवाड, शहर सचिव अशोक बचेवार,सुनील सावकार मुक्कावार, निशिकांत पाटील सर्व पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते उपस्थित होते..