● नगर पालिका कर्मचाऱ्यांनी तहसीलदार यांचे पत्र आणि निमंत्रण पत्रिका घेन्यास दिला नकार.
मुखेड ता.प्र.ज्ञानेश्वर कागणे, दि.१६ :
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमंत्रण पत्रिकासह तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी यांचे पत्र व निमंत्रण घेन्यास चक्क न.पा कर्मचाऱ्यांनी नकार दिल्याने तहसीलदार यांच्या आदेशाला चक्क केराची टोपली देण्यात आली आहे ? असा सवाल उपस्थित होत आहे.
१७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा केला जातो मराठवाड्यात ध्वजारोहण केला जातो त्याअनुषंगाने लोकप्रतिनिधी सह शहरातील सामाजिक व राजकीय कार्यकर्ते ,शासकिय कर्मचारी आणी पत्रकार यांना निमंत्रण पत्रीका दिली जाते.
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी निमंत्रण पत्रिका देण्यात आली आणी नगरसेवकांना निमंत्रण पत्रीका देन्यासाठी तहसीलदार मुख्याधिकारी यांना पत्र काढतात आणी नगरसेवकांना निमंत्रण देन्यासाठी आदेश देतात.
यंदा तहसील कार्यालयातील कर्मचारी संदिप गायकवाड हे पत्रीका व पत्र घेऊन गेले असता नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सदर पत्र व निमंत्रण हे घेन्यास नकार दिला आहे त्यामुळे तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदार यांच्या आदेशाला पाळत नसल्याचे दिसून आले आहे यावर तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी न.पा कर्मचाऱ्यांवर कोनती कारवाई करतात याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.