कुंडलवाडी प्रतिनिधी– रुपेश साठे दि.१६ :
येथील श्री बळीराजा गणेश मंडळ यांच्या तर्फे कै.स्वराज जेट्ठेवार यांच्या स्मरणार्थ भव्य मोफत नेत्र तपासणी शिबीर व औषध उपचार शिबिराचे दि.१८ सप्टेंबर २१ रोज शनिवार वेळ सकाळी १० वा ते सायंकाळी ५ वा पर्यँत, स्थळ जुने पोलीस ठाणे खिडकबेस गल्ली कुंडलवाडी येथे आयोजन करण्यात आले असून शहर व परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबाराचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री बळीराजा गणेश मंडळाच्या अध्यक्ष व सदस्यांकडून करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.लक्षमण चंदनकार (नेत्र चिकित्सक अधिकारी),डॉ.कसबे (नेत्र चिकित्सक अधिकारी ),सौ.सुरेखा नरेंद्र जिट्ठावार,(अध्यक्षा न.प.कुं ),शैलेश नारायण ऱ्याकावार (न.प.उपाध्यक्ष कुं),कारीमखान पठाण ( सहाय्यक पोलीस निरीक्षक कुं), विशाल सूर्यवंशी (पोलीस उपनिरीक्षक कुं),डॉ.विनोद माहुरे ( प्रा.आ.कें. वैद्यकीय अधिकारी कुं ), सौ.शकुंतलाबाई गंगाधरराव खेळगे ( नगरसेविका न.प.कुं ) यांनी उपस्थित राहणार आहेत.
तरी नागरिकांनी नोंदणी संपर्क मो.नं -९९६००५४१५६, ९९७५७२९०६१, ९६८९८७२१४३ या नंबर वर नोंदणी करावी.