दंतुलवार सोपान मरखेलकर, दि. १६: (मदनूर) मदनूरच्या मुनूरकापू गणेश मंडळाच्या वतीने भंडारा (अन्नदान) महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने कामरेड्डी जिल्ह्यातील मदनूर मंडळाच्या गांधी चौकात मुनूरकापू समाजातील बांधवांनी श्री गणेशाची स्थापना करून रोज सायन्स सकाळ संध्याकाळ भक्तिभावाने पूजा आरती करून आज मंडळातर्फे भंडारा (अन्नदान) चा कार्यक्रम या मुनुरकापू श्री गणेश मंडळी द्वारे करण्यात आला होता, यावेळी हजारो भाविकांनी या महा प्रसादाचा लाभ घेतला. या अनुदानाच्या कार्यक्रमासाठी समाजातील सर्व बांधवांनी परिश्रम घेतले.