दंतुलवार सोपान मरखेलकर, दि.१६ : कामारेडी जिल्ह्यातील मदनुर मध्ये गावातील हनुमान मंदिरामध्ये अभिषेक करण्यात आला सकाळपासूनच सर्व नागरिकांनी मंदिरांमध्ये साफसफाईच्या कामाला सुरुवात केली त्यानंतर मंदिराची सजावट करण्यात आली आचार्य श्री वेंकट महाराज व त्यांच्या सहकाऱ्यांनी मी मिळून मंत्रोच्चार व महापूजा आरती चा कार्यक्रम संपन्न केला त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे आयोजन भगवान तम्मेवार, व श्रीनिवास गौड. यांनी केले होते अशा प्रकारच्या पूजेचे आयोजन प्रथमच करण्यात आले होते या कार्यक्रमाला व महाप्रसादाला मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती होती.