मुखेड ता.प्रतिनिधी : ज्ञानेश्वर कागणे ०४ :
मुखेड येथील मौजे हिब्बट गावातील शिवारात काळविट जातिचे हरिन हे अनुसयाबाई गणेशराव केंद्रे याच्या शेतात बिमार अवस्थेत शेतकऱ्यांना निदर्शनास आले काळविटाला बिमार असल्याने उटता येत नसल्याचे पाहून शेतकऱ्यांने गावातील नागरिक व सरपंच यांना माहिती दिली सरपंचांनी माहिती मिळताच मुखेड येथील वनविभागाला पाचारण करुन फोनवरून पुर्व कल्पना दिली मुखेड येथील वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले व गावकरी व सरपंच माच्या मदतीने
काळविटास मुखेड येथील शासकीय पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखल करुन त्याच्यावर उपचार करुन वन विभागाच्या देखभाली खाली वन विभाच्या कार्यालयात ठेवन्यात आल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे काळविट वाचविण्यासाठी गावकऱ्यांनी व सरपंचांनी केलेल्या कार्याचे गावकऱ्यांकडुन कौतुक होत आहे.