फडणवीस यांच्या ताफ्यातील वाहनांची धडक ५ जखमी.

 

मुखेड प्रतिनिधी, ज्ञानेश्वर कागणे.दि.०४ :

मुखेड (जि.नांदेड) माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व विधानपरीषेद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या ताफ्यातील वाहनांची धडक दिल्याने पाच जन जखमी झाले. हि घटना गडगा मुखेड रोडवरील बेळीफाटा येथे रविवारी चार वाजन्याच्या दरम्यान घडली आहे.
जखमींना मुखेडच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यात बालाजी शंकर पवार २६ रा. मांजरी ता. मुखेड ,राजेश व्यंकटराव जाधव ३६ रा मुखेड, जमादार नामदेव सायबु दोसलवार ,समीर भिसे,३७ व अरविंद मोरे ४० अशी जखमी ची नावे आहेत.
वाहन ताफ्यातील कारने गडगा ते मुखेड मार्गावरील असलेल्या बरळी येथील राजे छत्रपती अक्यॉडमी जवळ दोन दुचाकीना धडक दिली अपघातात कोनतीही जिवीतहानी झाली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *