पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ.

सातारा, दि.२५ : सह्याद्री सहकारी  साखर कारखाना लि. यशवंतनगर या साखर कारखान्याचा  सन २०२१ -२२ च्या  ४८ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ  सहकार व पणन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत  संपन्न झाला.

या शुभारंभाप्रसंगी  कारखान्याचे संचालक सुरेश माने, जि.  प.   चे अर्थ व शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे यांच्यासह विद्यमान संचालक व ऊस उत्पादक शेतकरी  उपस्थित होते.

या वर्षी सह्याद्री साखर कारखान्यामार्फत जास्तीत जास्त   गाळप होण्यासाठी प्रयत्न केला जाईल.  यासाठी ऊसतोड मजूरांसह कारखान्याची सर्व यंत्रणा सज्ज  असल्याचे श्री पाटील यांनी यावेळी   सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *