खासदार चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त नांदेड जिल्हा पत्रकारांना अपघाती विमा
पत्रकार सुनील रामदासी यांची माहिती,
नांदेड – प्रतिनिधी -जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त नांदेड जिल्ह्यातील पत्रकार बांधवांना यावर्षीही मोफत अपघाती विमा प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार सुनील रामदासी यांनी दिली आहे.
पत्रकार बांधव हे समाजातील अत्यंत महत्त्वाचे घटक असून ते लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहेत. पत्रकारांच्या लेखणीच्या माध्यमातून त्यांचे सामाजिक कार्य सातत्याने सुरू असते. हीच बाब लक्षात घेऊन सतत तिसऱ्या वर्षी पत्रकारांच्या कुटुंबीयांना एक छोटासा आधार म्हणून खासदार चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त अपघाती विमा देण्याचे प्रयोजन करण्यात आले आहे. खासदार चिखलीकर हे समाजातील सर्व घटकांशी जोडलेले असल्याने त्यांची पत्रकारांसोबत चांगली नाळ जुळलेली आहे.
पत्रकार बांधवांनीही खासदार चिखलीकर यांच्या कार्याची दखल आपल्या वृत्तपत्राच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवली आहे. त्यांच्या सोबत असणारे नाते अधिक वृद्धिंगत होण्यासाठी आणि पत्रकार बांधवांच्या कुटुंबीयांना एक आधार मिळावा म्हणून हा छोटासा प्रयत्न असल्याचे सुनील रामदासी म्हणाले.
दरम्यान जिल्ह्यातील पत्रकार बांधवांना आपला विमा मिळावा यासाठी https://forms.gle/qBeAS5fXPj5Pz5sQ8 या लिंक वर गुगल ॲपच्या नोंदणी फॉर्मच्या माध्यमातून आपला अर्ज आमच्यापर्यंत संपूर्ण माहितीसह भरून पाठवावा, असे आवाहन संयोजक तथा पत्रकार सुनील रामदासी यांनी केले आहे.