हैदराबाद AIR NewsOnAir Radio ची झेप

NewsOnAir ॲपची भारतातील पहिली दहा शहरे

सलग चौथ्या आठवड्यात पुणे शहर या यादीत पहिल्या क्रमांकावर

मुंबई आणि पुणे यांचा पहिल्या दहा शहरांमध्ये समावेश

हैदराबाद आणि AIR कोडाईकनाल शहरांची NewsOnAir Radio थेट प्रसारणाच्या भारतीय क्रमवारीत वरच्या स्थानावर 

नवी दिल्ली, १६जुलै. Pib

न्यूज ऑन एआयआर अप्लिकेशनच्या ऑल इंडिया रेडिओ थेट प्रसारण सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या भारतातील मुख्य शहरांमधील ताज्या क्रमवारीत, हैदराबादने चेन्नईला तिसऱ्या स्थानावर विस्थापित केले आहे, तर पुणे आणि बंगळुरू यांनी चौथ्या आठवड्यात अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावरील स्थान कायम ठेवले आहे. जयपूर 8 व्या स्थानावर राहिले आहे तर भोपाळ 9 व्या क्रमांकावर सरकले आहे.

 

भारतातील आकाशवाणी प्रसारणाच्या क्रमवारील मोठ्या बदलांमध्ये, आकाशवाणी कोडाईकॅनालने क्रमांक 10 वरून क्रमांक 8 गाठला आहे. रेनबो कन्नड कामानबिलूने चौथ्या क्रमांकावर स्थान पटकाविले आहे, तर आकाशवाणी पुणे केंद्र पाचव्या क्रमांकावर घसरले आहे.

प्रसारभारतीच्या अधिकृत असलेल्या न्यूज ऑन एआयआर अप्लिकेशनवर आकाशवाणीच्या थेट प्रसारण सेवेमध्ये 240 पेक्षा अधिक रेडिओ सेवा आहेत. न्यूज ऑन एआयआर अप्लिकेशनवर ऑल इंडिया रेडिओचही ही प्रसारण सेवा ऐकणारा मोठा वर्ग केवळ भारतातच नव्हे, तर जागतिक स्तरावर विस्तारलेला आहे, जागतिक स्तरावर 85 पेक्षा अधिक देश आणि 8000 शहरांमध्ये याचा श्रोतावर्ग आहे.

न्यूज ऑन एआयआर अप्लिकेशनवरील ऑल इंडिया रेडिओचे थेट प्रसारण भारतातील कोणत्या शहरांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय आहे, यावर एक दृष्टिक्षेप टाकूया. आपल्याला न्यूज ऑन एआयआर अप्लिकेशनवर ऑल इंडिया रेडिओ थेट प्रसारणाचे भारतातील आणि शहरांनुसार याचे विभाजन पाहता येईल. ही क्रमवारी 16  जून ते 30 जून 2021 या पंधरवड्यातील आकडेवारीवर आधारित आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *