मूखेड आगरातील एस.टी.बस चालु होऊन सुध्दा नागरिकांची खाजगी वाहनांना पसंती,तर एसटी कर्मचाऱ्या बद्दल नागरिकात सहानुभूती

 

मुखेड प्रतीनिधी -ज्ञानेश्वर कागणे,

मुखेड दि. ३ :- मूखेड आगरातिल एसटी बस चालु होऊन सुध्दा नागरिकांची खाजगी वाहनांना पसंती तर एसटी कर्मचाऱ्यांकडून सहानुभूती याबाबत सविस्तर वृत्त असे की,
काल पासुन मूखेड आगारातील बस हि मुखेड नांदेड मार्गाने मार्गस्थ होत आहे.
एसटी बस चालू झाली असताना सुध्दा नागरिकांनी एसटी कडे पाठ फिरवून खाजगी वाहनांना पसंती दिल्याचे चित्र सध्या दिसुन येत आहे तर एसटी ने मोजकेच नागरिक प्रवास करताना दिसुन येत आहेत.


तर दुसरीकडे नागरिकांनमधे एसटी कर्मचाऱ्यांकडून सहानुभूती दर्शवली जात आहे व सरकार विरोधात नाराजी व्यक्त केली जात आहे तर दि ३ फेब्रुवारी २०२२ रोजी मुखेड नांदेड मार्गस्थ झालेल्या एसटी मधील प्रवास करणाऱ्या नागरिकांशी संवाद साधला असता नागरिकांनी एसटी कर्मचार्यांवर होत असलेला अन्याय सरकारने लवकर थांबवावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे व लवकरात लवकर एसटी पूर्व तपणे नागरिकांच्या सेवेत स्वरूप करण्याची इच्छा बोलून दाखवली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *