सांगली प्रतिनिधी, दि.०८ : सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी पलूस तालुक्यातील कुंडल येथे थोर स्वातंत्र्य सैनिक कै. कॅप्टन रामचंद्र लाड यांच्या कुटुंबियांची भेट घेवून सांत्वन केले. यावेळी आमदार अरूण लाड, किरण लाड, सुभाष पवार, मोहन पवार, श्रीकांत लाड आदि उपस्थित होते.
क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखालील प्रतिसरकारच्या तुफान दलाचे थोर स्वातंत्र्य सेनानी कॅप्टन रामचंद्र लाड यांचे वयाच्या शंभराव्या वर्षी कुंडल येथे निधन झाले. त्यांच्या कुटुंबियांना धीर देण्यासाठी आज सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी कुंडल येथे भेट देवून कुटुंबियांचे सांत्वन केले.
सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ.विश्वजीत कदम यांच्याकडून सांत्वन
सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनीही थोर स्वातंत्र्य सैनिक कै. कॅप्टन रामचंद्र लाड यांच्या कुटुंबियांची भेट घेवून सांत्वन केले. यावेळी तहसिलदार निवास ढाणे, बाळासो लाड, ग्रामपंचायत सदस्य किरण लाड, बाजीराव लाड, श्रीकांत लाड, नंदकुमार लाड आदि उपस्थित होते.