देगलूर (प्रतिनिधी) दि.२०/०५ /२०२२
जामा मस्जिद ते पत्रकार भंडरवार यांचे घर व जामा मस्जिद ते अमरदिप हॉटेल पर्यंत चे ड्रेनेजचे अपुर्ण काम सध्या फार मोठी डोके दुखी ठरत आहे. शिवाय जिवघेणे ही ठरत आहे. या दरम्यान ज्या ठिकाणी ड्रेनेज लाईनचे काम झाले तेथे मात्र चेंबरची झाकन अजूनही टाकली गेलेली नाहीत. म्हणूनच एखादा व्यक्ती मृत पावला तर मृतदेह सुध्दा घरापर्यंत वाहनाने नेणे अवघड झाले आहे. रस्त्याचे खोदकाम करून तर टाकले मात्र त्यांची दुरुस्ती अपुरी राहिली असल्याने नागरिक अधिक त्रस्त झाली असून देगलुर नगरपरिषदेच्या ढिसाळ कामगिरीवर कमालीची नाराज आहेत.
देगलूर नगरपरिषद अंतर्गत ड्रेनेज चे काम पूर्ण करण्यासाठी कोट्यवधीचा निधी मंजूर होऊन सुद्धा काही ठिकाणी कामे झालीच नाही. तर काही ठिकाणी अशी अपुरी असल्याकारणाने सबंध देगलूर वासियांकडून नगरपरिषदेच्या कार्यावर मात्र शंका निर्माण केली जात आहे. शिवाय तात्काळ हे अपुरे ड्रेनेज लाईनचे काम पूर्ण केले गेले नाही तर नगरपरिषदेच्या समोर उपोषण करण्यात येईल असे निवेदनात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष हबीब रहेमान यांनी म्हटले आहे.