नांदेड, दि. २९ :– राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बाल विकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चु कडू हे नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहिल.
रविवार २९ मे २०२२ रोजी वाशिम येथून शासकीय वाहनाने सायं ५.१५ वा. हदगाव येथे आगमन. सायं ५.३० वा. हदगाव ते तामसा मोटार सायकल रॅली कार्यक्रमास उपस्थिती. सायं. ६ वा. तामसा येथे बेघर बेरोजगार मेळाव्यास उपस्थिती. रात्री ९ वा. तामसा येथून शासकीय वाहनाने अमरावतीकडे प्रयाण करतील.