मुंबई प्रतिनिधी, दि.१४:- ‘भारताचे वारेन बफेट’ म्हणून ज्यांची ख्याती आहे असे गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचे दुःखद निधन झाले मृत्यू समय ते ६२ वर्षाचे होते. मागील अनेक दिवसापासून ते आजारापासून त्रस्त होते रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असे सूत्राद्वारे कळते मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांना नेण्यात आले होते असे देखील कळते.
नुकतेच त्यांनी कमी पैशात विमान सेवा सुरू करण्याची घोषणा केली होती. त्यांच्या निधनामुळे गुंतवणूकदारांमध्ये शोककळा पसरली आहे.