स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव
देगलूर प्रतिनिधी,दि.१४ :- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संपूर्ण देश मोठ्या उत्साहाने साजरा करीत असून येथील अडत व्यापारी शिक्षण संस्था संचालित देगलूर महाविद्यालय देगलूर राष्ट्रीय सेवा योजना व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतिने विद्यार्थ्यांची प्रभात फेरी चे आयोजन (दि.१३ऑगस्ट)रोजी करण्यात आले.
या प्रभात फेरी मध्ये कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या कला वाणिज्य विज्ञान शाखेतील इयत्ता अकरावी बारावी वर्गाच्या सर्व विद्यार्थ्यांनी यावेळी हातात राष्ट्रध्वज तिरंगा घेऊन “वंदे मातरम” “हर घर तिरंगा ” आदी चा नारा देत सहभाग नोंदविला होता या प्रभात फेरी मध्ये कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य एन एच गोविंदवार पर्यवेक्षक एस एन पाटील
समन्वयक एम एम चमकुडे राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रा. हणमंत वाकडे प्रा. गौतम भालेकर प्रा. डॉ. शेरीकर प्रा. एकनाथ पाटील प्रा. महेश कुलकर्णी प्रा. सीताराम हाके प्रा. अभय कळसकर प्रा. खुशाल बेबंरेकर प्रा. शिवचरण गुरूडे प्रा.सौ एस वाय वद्देवार प्रा. सौ. तोंडारे प्रा.सौ.देबडवार प्रा डॉ चंद्रशेखर बाकेवाड प्रा.नरेंद्र मुक्तावार प्रा.दासरवार प्रा. सचिन कोंडेकर प्रा.राजेंद्र भुसाळे प्रा. संतोष वानोळे प्रा.तुकाराम लागले ;प्रा नागरगोजे प्रा पाटील दत्ता प्रा.लक्ष्मीकांत मल्लूरवार प्रा लझडेप्रा सत्यजीत सावळे ;प्रा गुडूसाब, आदी सह विद्यार्थी उपस्थित होते .