नांदेडप्रतिनिधी,दि.२८:- गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल देण्याच्या योजनेचे सन २०२२-२३ या वर्षातील अर्ज कार्यालयास प्राप्त झाले होते.
त्यानुषंगाने प्राप्त अर्जाची छाननी करण्यात आलेली आहे. सदर पात्र अर्ज, त्रुटी पूर्तता अर्ज व अपात्र अर्ज याची यादी कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर लावण्यात आलेली आहे. अर्जदारांनी यादीनुसार १४ ऑक्टोंबर २०२२ पर्यंत त्रुटीतील कागदपत्रांची पूर्तता करुन अर्ज समाज कल्याण कार्यालयास सादर करावेत.
असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. तेजस माळवदकर यांनी केले आहे.