देगलूर प्रतिनिधी, दि . ११ :- अडत व्यापारी शिक्षण संस्था संचलित देगलूर महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागाच्यावतीने मानवी हक्क दिनाच्या निमित्याने आयोजित व्याख्याना विद्यार्थ्यानी चांगला प्रतिसाद दिला आहे.
मानवी हक्क विषयी विद्यार्थ्यामध्ये जनजागृती व्हावी, या उद्देशाने अभ्यासपूर्ण व्याख्यान सामाजिक कार्यकर्ते मच्छिंद्र गवाले यांनी आपले विचार व्यक्त केले.त्यामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना मानवी हक्कांची जनजागृती केली.
या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मोहन खताळ, ऊपप्राचार्य डॉ. अनिल चिद्रावार , कनिष्ठ महाविद्यालायाचे ऊपप्राचार्य एम .एम. चमकुडे , राज्यशास्त्र विभागाचे डॉ .माधव चोले, पर्यवेक्षक प्रा. संग्राम पाटील , प्रा डॉ संजय पाटील प्रा .दिपक वावधाने,प्रा.उत्तमकुमार कांबळे, प्रा. डॉ.धनराज लझडे
,प्रा.दासरवाड,प्रा.सुर्यवंशी व मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी यानी उपस्थिती नोंदविली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ. माधव चोले केले. तर आभार प्रा.डॉ धनराज लझडे आणि सुञसंचलन प्रा. माल्हारी कांबळे यांनी केले.