देगलूर प्रतिनिधी,दि.२३:- भारतीय स्तरावर संत साहित्यावर उत्कृष्ट साहित्य तथा वाडःमय लिहिणाऱ्या लेखकास प्रतिवर्षी ज्ञानोबा तुकाराम पुरस्काराने सन्मानित करणारी योजना शासन स्तरावरून मान्य करण्यात आली आहे.
शासन निर्णयानुसार ज्ञानोबा ~तुकाराम पुरस्कार निवड समिती गठित करण्यात आली असून या समितीमध्ये तीन शासकीय सदस्य आणि पाच अशासकीय सदस्यांची निवड जाहीर करण्यात आली आहे.
या समितीमध्ये अशासकीय सदस्य म्हणून देगलूर येथील मुक्ताई प्रतिष्ठानचे सचिव संत साहित्याचे अभ्यासक मा.राजेश महाराज देगलूरकर यांची निवड करण्यात आली आहे.
त्यांच्या या निवडी बद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.