श्री शिवाजी एज्युकेशनल कॅम्पस, देगलूर ची क्रिडा क्षेत्रात यशस्वी वाटचाल

देगलूर प्रतिनिधी,दि.१४:- नांदेड जिल्हा व विभागस्तरीय बॅडमिंटन व बॉल बॅडमिंटन क्रीडा स्पर्धेत घव घावित यश प्राप्त केले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य,पुणे व जिल्हा क्रीडा कार्यालय, नांदेड तर्फे आयोजित

तालुका, जिल्हा व विभागीय क्रीडा स्पर्धेत विद्यार्थ्यानी बाजी मारत बॅडमिंटन स्पर्धेत तालुक्यात १७ वर्षाखालील मुलांचा व १४ वर्षाखालील मुलींचा संघ प्रथम आला आहें. याच संघाने जिल्हास्तरावर द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला आहे.

 

 

 

तसेच जिल्हास्तरावर आयोजित करण्यात आलेल्या बॉल बॅडमिंटन या क्रीडा प्रकारात शाळेतील १७ वर्षाखालील व १४ वर्षाखालील मुलांचा संघ जिल्ह्यातून प्रथम आला आणि किनगाव (लातूर) येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.

 

 

 

देगलूर परिसरातील ग्रामीण भागातील या शाळेने आपल्या गुणवत्तेची परंपरा कायम ठेऊन अभ्यासाबरोबरच खेळामध्येही आम्ही काही कमी नाही हे सिद्ध करून दाखवले आहे. विद्यार्थी अभ्यास आणि खेळ या दोन्ही गोष्टींची सांगड घालून यश संपादन करत असतात.

 

 

 

 

या सर्व खेळाडूंच्या यशात शाळेचे मुख्याध्यापक श्री. आर. बी.कोंडवार ,श्री व्ही.व्ही. नरवडे तसेच विद्यार्थ्याच्या सरावासाठी नेहमी प्रयत्नशील राहून अहोरात्र प्रयत्न करणारे शाळेचे क्रीडाशिक्षक श्री. एम.एच.कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

 

 

 

 

तसेच नेहमी सहकार्याची भावना ठेवणारे देगलूर महाविद्यालयाचे क्रीडा विभाग प्रमुख श्री. डॉ.निरजकुमार उपलंचवार व सहकारी म्हणून कार्य करणारे वरिष्ठ महाविद्यालयातील बॉल बॅडमिंटन संघाचा खेळाडू आश्र्वजीत वाघमारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

 

 

 

 

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. प्रकाश पाटील बेंबरेकर,सचिव श्री. शशिकांत चिद्रावार, उपाध्यक्ष श्री .नारायणराव मैलागिरे, सह सचिव श्री. सूर्यकांत नारलावार, कोषाध्यक्ष श्री विलास तोटावार व कार्यकारिणी मंडळ सदस्य श्री.राजकुमार महाजन, डॉ.कर्मवीर उंग्रतवार, गंगाधर जोशी,जनार्दन चिद्रावार, रविंद्रआप्पा ध्याडे, देवेंद्र मोतेवार, चंद्रकांत नारलावार तसेच

 

 

 

 

तिरुमला फौंडेशन नांदेड चे अध्यक्ष श्री गजाननराव पापंटवार, सचिव अंजलीताई पापंटवार, देगलूर महाविद्यालयाचे प्राचार्य. डॉ.मोहन खताळ, उपप्राचार्य. डॉ.अनिल चिद्रावार यांनी व शिक्षकवृंद आणि सर्व स्तरातून विद्यार्थ्यांच्या नेत्रदीपक कामगिरीमुळे तालुक्याचे नाव लौकीक केल्याबद्दल अभिनंदन केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *