देगलूर प्रतिनिधी,दि.१४:- नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथील होमगार्ड पथकातील होमगार्ड ७६ वा वर्धापन दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
देगलूर शहरातील मुख्य रस्त्याने पथसंचलन करण्यात आले आहे मानव्य विकास विद्यालयात श्रमदान व अंधशाळेत खाऊचे वाटप करण्यात आले. पथसंचलन प्रसंगी प्रभारी तालुका समादेशक अशोक पैलावार, फलटण नायक तानाजी पाटील, मारुती येशमवार,शिवाजी मोरे, नजीरोदिन कुरेशी,आनंद थडके, रमेश
चपलवार,विठल चिंचलवार,धोंडीबा पाटील,सचिन फुगारे.शिवाजी हांळबरे, नागनाथ उपलवार,सुनिल कांबळे,नारायण साधु, रेखा चैनपुरे, संगीता येरकरवार, चतुराबाई इबितवार,कुसुम इबितवार, यांच्यासह इतर होमगार्ड पुरुष महिला उपस्थित होते.