नांदेड ४ ऑगस्ट:- अवयवदान दिनानिमित्त आरोग्य मंत्री प्रकाश आबीटकर, महाराष्ट्र राज्य, मुंबई तसेच आयुक्त आरोग्य सेवा, आयुक्तालय मुंबई यांच्या सूचनेनुसार संपूर्ण राज्यभरात ०३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत अंगदान जीवन संजीवनी अभियान राबविण्यात येत आहे.
त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली आज मेघना कावली मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखून रॅलीची सुरुवात करण्यात आली.
मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा १९९४ नुसार ३ ऑगस्ट १९९४ रोजी भारतामध्ये पहिले हृदय प्रत्यारोपण प्रक्रिया पार पडल्यामुळे ३ ऑगस्ट हा दिवस अवयवदान दिन म्हणून साजरा केला जातो .हा उद्देश समोर ठेवून या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
ही रॅली शहरातील आय टी आय कॉर्नर येथील महात्मा फुले पुतळ्यापासून श्री गुरु गोबिंद सिंघजी स्मारक, जिल्हा रुग्णालय नांदेड अशी काढण्यात आली. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणूनजिल्हा परिषदेच्यामुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली
अधिष्ठाता डॉ सुधीर देशमुख, डॉ.यशवंत पाटील अधिष्ठाता शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालय नांदेड, डॉ. संजय पेरके जिल्हा शल्यचिकित्सक श्री गुरु गोबिंद सिंघजी स्मारक, जिल्हा रुग्णालय नांदेड, डॉ. संगीता देशमुख जिल्हा आरोग्य अधिकारी,जिल्हा परिषद नांदेड, डॉ हनुमंत पाटील आरएमओ, श्रीमती बोथीकर प्राचार्या शासकीय परिचर्या प्रशिक्षण केंद्र नांदेड, डॉ. प्रल्हाद कौटकर अध्यक्ष इंडियन
मेडीकल असोसीएशन , डॉ. संजय देलमाडे अध्यक्ष निमा, डॉ. मैदपवाड स्टार किडनी सेंटर , इनेर्वेल क्लब चे अध्यक्ष विद्या पाटील अवयवदान अर्पण समितीचे माधव अटकोरे निमा वुमेन्स फोरम चे अध्यक्ष डॉ. करूणा जमदाडे व सचिव माया पवार हे उपस्थित होते.सदरील रॅलीचा समारोप हा श्री गुरु गोबिंद सिंघजी स्मारक, जिल्हा रुग्णालय नांदेड येथे झाला. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय पेरके यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली अवयव दान जनजागृती कार्यक्रम
दिनांक ३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान साजरा केला जाणार असून या कालावधीत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. अवयवदानामुळे एक व्यक्ती ८ लोकांचे जीवन वाचवू शकतो. यासाठी प्रत्येक व्यक्तीने अवयवदानाचा संकल्प करावा तसेच अधिक माहितीसाठी टोल फ्री क्रमांक (२४*७) १८००-११४७-७० संपर्क साधावा.
weblink – https://notto.abdm.gov.in/pledge-registry/&website www.notto.mohfw.gov.in
तसेच शहरातील व जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी अवयवदानाचा संकल्प करून या अभियानामध्ये सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय पेरके यांनी केले.
या कार्यक्रमासाठी जिल्हा रुग्णालय नांदेड येथील सर्व अधिकारी कर्मचारी व शासकीय परिचर्या प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थी उपस्थित होते.