नांदेड प्रतिनिधी, दि.२०:- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त काल जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी अभिवादन केले. यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हा परिषद अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, आमदार अमर राजूरकर, महापौर जयश्रीताई पावडे, माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत, मनपा स्थायी समितीचे सभापती किशोर स्वामी आदी मान्यवर उपस्थित होते.