किनवट प्रतिनिधी,(सी.एस.कागणे) दि. २८:- कृषिव्यवस्थेचा विकास भारतीयांच्या उज्ज्वल यशासाठी व उन्नतीसाठी महत्त्वाचा भाग असून तरुणांनी आधुनिक शेतीचा मोठ्या प्रमाणात वापर करावा असे आवाहन उपविभागीय कृषिअधिकारी दिगंबर तपासकर यांनी केले सरस्वती विद्या मंदिर कला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या सात दिवसीय शिबिराच्या समारोप प्रसंगी तेबोलत होते . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरस्वती शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष नरसिंगराव सातुवार होते सरस्वती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व्यंकटराव नेमानीवार ,गावचे प्रतिष्ठित नागरिक व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आनंद भंडारे प्रमुख पाहुणे उपस्थित होते. नैसर्गिक संसाधनाच्या संवर्धनासाठी विशेष शिबिराचे आयोजन मौजे वंजारवाडी (दिगडी मंगाबोडी )येथे दिनांक १९ ते २५ मार्च या कालावधीत करण्यात आले होते .प्रारंभी दीपप्रज्वलन,करून महात्मा गांधी च्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले महाविद्यालयाच्या वतीने सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
मान्यवरांचे स्वागत कु.पूजा मेश्राम. हिने स्वागत गीत गाऊन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक व अहवाल वाचन माजी कार्यक्रमाधिकारी डॉ रामकिशन चाटे यांनी केले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आनंद भंडारे यांनी या एकूणच शिबिराच्या मागील हेतू व्यक्त करत भविष्यात कोणती काळजी घ्यावी लागणार आहे यावर आपले मत व्यक्त केले. सरस्वती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. व्यंकटराव नेमानीवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना भूतकाळाची ओळख ठेवून वर्तमान काळात भक्कम पणे विद्यार्थ्याने पावले उचलावीत असे आवाहन केले राष्ट्रीय सेवा योजना हे विद्यार्थ्यांना माणूस बनवण्यासाठी महत्त्वाचे शिबिर आहे त्यासाठी विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त या शिबिराचा फायदा घ्यावा असे मत व्यक्त केले.
विद्यार्थ्यांनी या सात दिवसीय अविनाश कुसराम, सौरव नैताम कार्यक्रमाधिकारी प्रा अजय किटे यांनी शिबिराचे अनुभव कथन केले यावेळी पहिले विश्वात्मक संत साहित्य संमेलन कोल्हापूर येथे होत असून त्यात परिसंवादासाठी डॉ .मार्तंड कुलकर्णी यांना निमंत्रित केल्याबद्दल सरस्वती शिक्षण संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला .संस्थेचे उपाध्यक्ष नरसिंगराव सातूरवार यांनी आपल्या अध्यक्षीय समारोपातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. हास्य योगातून विद्यार्थ्यांना ऊर्जा व कार्य करण्याची स्फूर्ती मिळते विद्यार्थ्यांकडून हास्य योग करून घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ किरण आयनेनीवार यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ मनोहर थोरात यांनी केले कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ सर्व प्राध्यापक वर्ग व स्वयंसेवक बहुसंख्येने उपस्थित होते.