राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते ‘यू ॲण्ड मी अनप्लग्ड’ या कादंबरीचे प्रकाशन

मुंबई, दि. २६ :- भारतीय नौदलातील लेफ्टनंट कमांडर आनंद सॉ लिखित ‘यू ॲण्ड मी अनप्लग्ड’ या कादंबरीचे प्रकाशन माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री कु. आदिती तटकरे यांनी नुकतेच केले.

मुंबईतील महाराष्ट्र नेवल एरियामध्ये आयएनएस आंग्रे, फोर्ट येथे लेफ्टनंट कमांडर या पदावर कार्यरत असलेले या कादंबरीचे लेखक ए.के. सॉ यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्या अनुभवांचे इंग्रजी भाषेतील विविध कथांतून वर्णन केले आहे.

देशसेवेचे व्रत अविरतपणे जोपसताना आपल्या अनुभव, कल्पनांमधून साकारण्यात आलेले हे पुस्तक वाचकवर्गासाठी साहित्याची भेट ठरेल, असे सांगून राज्यमंत्री कु. आदिती तटकरे यांनी लेफ्टनंट कमांडर ए.के. सॉ यांना या पुस्तकासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी  लेफ्टनंट अशोक कुमार, नेवल अधिकारी तृप्ती शर्मा आदी या पुस्तक प्रकाशनासाठी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *