देगलूरमध्ये गाजणार भक्तीचा स्वर – श्री राघवेन्द्र स्वामी आराधना महोत्सवाला सुरुवात

 

देगलूर प्रतिनिधी,दि.१२:- प्रतिवर्षीप्रमाणे या वर्षीही श्री राघवेंद्र स्वामी मंदिर येथे आराधना महोत्सव सुरू झाला आहे यावर्षी आराधना महोत्सवानिमित्त श्री राघवेन्द्र स्वामी मंदिर, देगलूर येथे संगीत साधना मंचमंचतर्फे भक्तीगीत व अभंग गायन सेवा आयोजित करण्यात आली आहे.

 

 

या गायन सेवेमध्ये सोमेश मदनूरकर,गंगाप्रसाद मिर्झापूरकर, इंजि. बालाजी ग्रंथमवार, विजय दासरवाड,लक्ष्मण अमृतवार, संजय मोतेवार, शीतलकुमार कुलकर्णी, मनोरमा सांगवीकर डॉ. सुनील जाधव, सुरेखा मदनूरकर यांचा सहभाग असणार आहे.

 

 

या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून श्री राघवेन्द्र स्वामीं राघवेन्द्र स्वामींच्या आराधना महोत्सवाचा उत्सव साजरा करण्यात येणार आहे.

 

 

या प्रसंगी भक्तिमय वातावरणात विविध कलाकारांकडून अभंग, कीर्तन व भजनांच्या माध्यमातून भक्तांना आध्यात्मिक आनंद घेण्याची संधी मिळणार आहे.

 

आयोजक समितीने सर्व भाविकांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

 

दिनांक: १२ ऑगस्ट २०२५ (मंगळवार)

वेळ: सायं. ५:३० वाजता

स्थळ: श्री राघवेन्द्र स्वामी मंदिर, देगलूर